Pune : लोकअदालतीत सुमारे २ कोटी ३३ लाख वसुली!

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका, न्यायालयात विधिसेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत सुमारे 2 कोटी 33 लाख 70 हजर रुपये वसुली करण्यात आली.

यावेळी पुणे मनपाच्या विधी सल्लागार, पाणीपुरवठा, मालमत्ता व व्यवस्थापन, अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मनपा न्यायालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा, मालमत्ता व व्यवस्थापन, अतिक्रमण विभागाकडील प्री लिटीगेशन केसेस बाबत नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. सुमारे २ कोटी ३३ लाख ७० हजार वसुली स्वरूपात प्राप्त झाले.

याप्रसंगी न्यायाधीश-अ, ब तहसीलदार,अनुराधा पांडुळे, अ, द, डांगे, श्रीमती गिरोडकर उपस्थित होते. विधी सल्लागार ऍड, मंजुषा इधाते यांनी संपूर्ण कामकाजाचे नियोजन केले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनीही याप्रसंगी भेट दिली, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.