Pune corona update : पुणे विभागात कोरोनाचे 2 लाख 21 हजार 818 रुग्ण

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 612 ने वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 818 झाली आहे. त्यातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 54 हजार 274 ॲक्टीव रुग्ण आहेत. कोरोनाबाधीत एकूण 5 हजार 934 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

शुक्रवारी (दि. 28) रात्री 9 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 18 हजार 428 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 21 हजार 818 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 612 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 611, सातारा जिल्ह्यात 575, सोलापूर जिल्ह्यात 268, सांगली जिल्ह्यात 463 तर कोल्हापूर जिल्ह्यात 695 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 455 रुग्णांपैकी 1 लाख 23 हजार 595 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 63 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.3 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 218 रुग्णांपैकी 6 हजार 787 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 121 रुग्णांपैकी 12 हजार 624 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 781 आहे. कोरोनाबाधित एकूण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 293 रुग्णांपैकी 5 हजार 656 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 731 रुग्णांपैकी 12 हजार 948 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 129 आहे. कोरोनाबाधित एकूण 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.