Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 20 आमदार कोणाच्याही संपर्कात नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Pune) हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडी बाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलताना आपली भूमिका देखील मांडली.

शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या देणं बंद कराव.(Pune) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 20 आमदार कोणाच्याही संपर्कात नाही आणि त्यांचे देखील आमदार आमच्या संपर्कात नाही.तसेच उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कोणी असलं तरी मला माहिती नाही. अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Pimpri : राज्य सरकारच्या ‘त्या’ अध्यादेशामुळे 17 लाख कायमस्वरूपी नोकर्‍यांवर कुर्‍हाड; उद्या कँडल मार्च

जयंतराव पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो : अजित पवार

2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री (Pune) असणार अस विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्या वर अजित पवार म्हणाले की,जयंतराव पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो आणि त्यांच म्हणणं खर ठरो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.