Pune : भिशीचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून कात्रजमध्ये एकाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज- भिशीचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून चिडून दोन जणांनी एका इसमाचा त्याच्या राहत्या घरी सत्तूरने वार करून खून केला ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता साईनगर कात्रज इथे घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात….

चंदर मुडावत ( रा. स. नं 63, साईनगर गल्ली नं 3 कात्रज पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. रामु मुडावत आणि लालु मुडावत (रा. गोकुळनगर, रा. कात्रज कोंढवा रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी लक्ष्मी चंदर मुडावत (वय 28 वर्ष रा. स. नं 63, साईनगर गल्ली नं 3 कात्रज पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.