Pune: खडकीमध्ये आजपर्यंत 27 कोरोना रुग्ण

Pune: 27 corona patients in Khadki Cantonment Board area till date

एमपीसी न्यूज – संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत गेल्या महिनाभरात एकूण 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

पुणे महापालिकेच्या हद्दीलगत खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. संरक्षण क्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या या भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. पुणे शहरात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले तोपर्यंत या दोन्ही कॅन्टोन्मेंट हद्दीत मात्र कोरोना रुग्ण नव्हते.

गेल्या महिन्याभरात मात्र या आजाराच्या संसर्गाने त्या हद्दींमध्ये प्रवेश केला आणि रुग्णांची संख्या वेगाने वाढली. निवासी भागात रुग्ण आढळले. दोन दिवसांपूर्वी एका लष्करी जवानाची तपासणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू असून या जवानाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या जात असून लॉकडाऊनही कडकपणे सांभाळला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.