Pune : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

एमपीसी न्यूज : “भारताची सर्वच क्षेत्रात दमदार (Pune) वाटचाल सुरु आहे. भूतकाळात रमण्यापेक्षा भविष्याकडे विश्वासाने पाहायला हवे. पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासह वाचन वाढवावे. विविध महात्म्यांच्या आत्मचरित्रातून प्रेरणा घ्यावी,” असे प्रतिपादन डीआरडीओ येथील माजी संचालक (एचईएमआरएल) व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. आर. के. पांडे यांनी केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. आर. के. पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ‘जी 20’च्या पार्श्वभूमीवर केलेली सजावट, महापुरुषांचे भव्य कट आउट, वैविध्यपूर्ण पोशाखात विद्यार्थी, शिक्षक व पालक यामुळे कॅम्पसमधील वातावरण चैतन्यमय होते.

Crime News : दोन पिस्टल, जिवंत काडतुसे व कोयत्यासह दोघांना अटक

याप्रसंगी सूर्यदत्त ग्रुपच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, कार्यकारी संचालक अक्षित कुशल, संचालक शीला ओक, संचालक प्रशांत पितालिया, प्रा. आरिफ शेख, प्रा. डॉ. सीमी रेठरेकर, प्रा. मनीषा कुंभार, प्रा. किरण राव , प्रा. दीपक सिंग, प्रा. अतुल देशपांडे , रोहित संचेती, बटु पाटील, मारुती मारेकरी, केतन, नितीन कामठेकर यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

डॉ. आर. के. पांडे म्हणाले, “शिक्षण ही एक तपस्या आहे. आपण (Pune) ही तपस्या योग्यप्रकारे केली पाहिले. मला मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्यासमवेत काम करण्याचा अनुभव घेता आला, याचा अभिमान वाटतो. त्यांचा संघबांधणीवर विश्वास होता. आपल्या क्षमतेवर आपण काय करू शकतो, याचा विचार ते सतत करत असत.”

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सर्वाना 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्र सेवेला प्रथम स्थान मानणाऱ्या ‘सूर्यदत्त’मध्ये भारत देशाचा एक सर्वोत्कृष्ट नागरिक बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अभिमान आणि राष्ट्रनिष्ठा त्यांच्यात रुजविली जाते.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमात सहभाग घेत सूर्यदत्त नॅशनल स्कुलची आर्जवी पाठक हिने इंग्रजीतून, तर पृथ्वीराज सिंग परमार याने हिंदीतून भाषण केले. सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या चिन्मयी काळभोरने ‘ए वतन’ गीत सादर केले. सानिका जोशी हिने इंग्रजीतून भाषण केले. प्राचार्य वंदना पांड्ये यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.