Pune : शहरातील कोरोना बळींमध्ये 90 टक्के जेष्ठ नागरिक : डॉ. दीपक म्हैसेकर

90 per cent senior citizens among corona victims in the city: Dr. Deepak Mhaisekar

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनामुळे 90 टक्के मृत्यू जेष्ठ नागरिकांचे झाले आहेत. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, किडनी असे अनेक आजार होते, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तसेच जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील महापालिका व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे, औषधोपचार करणे, अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 31 हजार 249 क्विंटल अन्नधान्याची तर 15 हजार 629 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.

विभागात 3 हजार 180 क्विंटल फळांची तसेच कांदा-बटाटयाची आवक 8 हजार 322 क्विंटल इतकी झाली आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 27 मे 2020 रोजी 95.50 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.15लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.