Pune : अमेरिकन डॉलर्स आणि 4 लाख 82 हजार रुपये असलेली बॅग चोरीला

एमपीसी न्यूज : पुण्यातील बाणेर परिसरात एका (Pune) क्लिनिकमधून अमेरिकन डॉलर्स आणि रोख रक्कम असलेली 4 लाख 82 हजार रुपयांची बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी क्लिनिकचे मालक रितेश शहा यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांचे बाणेर येथील ऑर्किड शाळेजवळ श्रद्धा पॉलीक्लिनिक आहे.

Pune : सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील- चंद्रकांत पाटील

ही घटना घडली तेव्हा शाह रुग्णालयात होते. त्यावेळी पैसे असलेली बॅग त्यांच्याकडे होती. मात्र, बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार अशोक वनवे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.