Pune : येण्या-जाण्याचा रस्ता बंद करून महिलेला दिली जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – तारेचे कंपाउंड तोडून तेथे गेट लावून (Pune)येण्या जाण्याचा रस्ता बंद केला. तसेच महिलेलाव तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना 5 ते 6 डिसेंबर या कालावधीत वाकड येथे घडली आहे.

महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी सुरेश हरिभाऊ भुजबळ, मयुर सुरेश भुजबळ, चार महिला आरोपी, तेजल मयुर भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : वन विभागाच्या जागेतील कामांचा अडसर होणार दूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Pune)फिर्यादी यांचे तारेचे कंपाऊंड तोडून तेथे आरोपीने गेट लावून फिर्यादी यांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद केला. तसेच हातात कुऱ्हाड घेवून फिर्यादीच्या अंगणातील पाच अंब्याची झाडे तोडली.

तसेच शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.