Fit India Champion: पुण्यातील आयली घिया ठरली ‘फिट इंडिया चॅम्पियन’ 

एमपीसी न्यूज : नृत्य, क्रीडा आणि अभिनय या त्रिसूत्रीचा अवलंब करून सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत असलेली युवा अभिनेत्री, नृत्यांगना आयली घिया हिची केंद्र सरकारच्या वतीने ‘फिट इंडिया चॅम्पियन’ म्हणून निवड करण्यात आली आहे.(Fit India Champion) आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृती करण्यात आघाडीवर असलेली आयली घिया हिची केंद्र सरकार स्पोर्टस्‌‍ ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (साई) गेल्या वर्षी ‘फिट इंडिया ॲम्बेसेडर’ म्हणून निवड केली होती, अशी माहिती आयली आणि आयलीज्‌‍ डान्स अँड आर्ट ॲकॅडमीच्या उपाध्यक्षा डॉ. कविता घिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक उपक्रमांची दखल घेऊन या वर्षीही पुन्हा एकदा आयली घिया हिला ‘फिट इंडिया ॲम्बेसेडर’ बनण्याचा मान मिळाला आहे.(Fit India Champion) पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. कविता आणि डॉ. प्रमोद घिया यांची आयली ही कन्या असून तिला आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी घरातूनच बाळकडू मिळाले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात झालेली निवड आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना आयली हिने व्यक्त केली आहे.

Asiancon 2022 : बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाशिवाय संशोधन नाही : डॉ. पंडित विद्यासागर

समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने भविष्य काळात विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याचा आपला मानस आहे. तसेच कलेच्या माध्यमातून विशेषत: नृत्याद्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते, असे कु. आयली हिने अधोरेखित केले. ‘फिट इंडिया ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाल्यानंतर आयली हिने ‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन जनजागृती करण्यावर भर दिला. (Fit India Champion) खेळाडूंना प्रोत्साहन देणे, आरोग्यविषयक विविध उपक्रमांचा स्वत:च्या सर्जनशिलतेचा उपयोग करून प्रचार आणि प्रसार करण्यावर लक्ष केंद्रीत केले.

कोरोना काळात आयली हिने समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून ‘जर्नी टूवर्डस्‌‍ हेल्दी लाईफ’ हा अनोखा उपक्रम सुरू करून त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांबरोबर चर्चा करून जनसामन्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक विविध समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.(Fit India Champion) सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रसिद्ध एकपात्री कलावंत संतोष चोरडिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन आयली आणि डॉ. कविता घिया यांनी समाजातील विशेष घटकांसाठी आयोजित विविध उपक्रमात सहभागी होऊन त्यांना आनंद दिला आहे. सिप्ला कॅन्सर संस्था, अपंग कल्याणकारी संस्था, वृद्धाश्रम, मूकबधीर विद्यालय, एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांचे स्नेहालय तसेच भारतीय जवानांसाठी कारगील येथे विविध सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम सादर केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.