Pune : नोकरी लावण्याच्या आमिषाने जवळपास 20 ते 25 गरीब तरुणांची फसवणूक; भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रकरण आणले समोर

एमपीसी न्यूज – पुण्यातील सातारा (Pune) रस्त्यावरील काका हलवाई इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये स्पिन्स सोर्स नावाच्या बोगस कंपनीमधून हजारो तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक होत असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी शैलजा पाठक यांच्याकडे आली. या घटनेची चौकशी करून त्या ठिकाणी गेल्यावर जवळपास 25 तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर पाठक यांनी पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धी सहप्रमुख पुष्कर तुळजापूरकर व महिला आघाडी सरचिटणीस प्रियांका शेंडगे यांच्याशी संपर्क करून या प्रकरणाविषयी माहिती दिली.

Alandi: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतले माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन

त्यानंतर तुळजापूरकर व शेंडगे यांनी पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क साधून या कंपनीच्या कार्यालयात छापा मारण्याची विनंती केली. या ठिकाणी पोलीस पोचले असता, अनेक तरुणांची व तरुणीं फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी मौलिक राजा नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी चालू केली आहे. या घटनेची (Pune) फिर्याद ही या ठिकाणी दाखल होत असून लवकरच ती आपणाकडे प्राप्त होईल, असल्याचे कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.