Pune : पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार; प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती पुढे

एमपीसी न्यूज – पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांपैकी पूर्ण आणि अंशत: घर जळालेल्या 10 कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात 28 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान भीषण आग लागली होती. यात आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आगी वरती त्वरित नियंत्रण मिळवले होते.

  • जिल्हाधिकारी कार्यालयाने जळीतग्रस्तांचे पंचनामे केले असून, त्यानुसार अंशतः बाधित घरांची संख्या ही 5 इतकी आहे. तर पूर्णतः बाधित कुटुंबांची संख्या 5 इतकी आहे,  असा रिपोर्ट महापालिकेला सादर केला आहे.

त्यानुसार पूर्णतः बाधित पाच कुटुंबाना प्रत्येकी 11 हजारांची तर अंशतः बाधित पाच कुटुंबाना प्रत्येकी 5 हजाराची मदत करण्यात येणार आहे. हे पैसे लगेचच डीबीटीने संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहेत, असा प्रस्ताव स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.