Pune : महापालिकेच्या आवाहनाला संस्था, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; व्हेंटिलेटरसह अन्य मदत प्राप्त

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत मनपाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. अलिकडे मनपा प्रशासनाच्या वतीने मदतीसंदर्भात आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनास अनुसरून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे.

अमनोरा संस्थेकडून N-95 मास्क -१०००,-इन्फोयसिस फौंडेशन यांचेकडून- ४, व्हेंटिलेटर व ४ मॉनिटर, भारत दिगंबर मोहिते (कार्यकारी अभियंता, पथविभाग, पुणे, मनपा) यांचेकडून ३६ हजार रुपये, संदीप सुदाम कुंजीर (पार्क इन्फोनिया, फुरसुंगी) यांच्याकडून ११ हजार रुपये, राजीव बासरगेकर यांचेकडून रुपये २५००, सकाळ रिलीफ फंड, पुणे यांचेकडून रुपये ५,६०,०००/- (या रकमेचा विनियोग डॉ. नायडू रुग्णालय व बोपोडी येथील द्रौपदाबाई खेडेकर रुग्णालयातील आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री खरेदी करणेकरिता) अशी मदत महापालिकेला करण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने मदतीचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.