Pune : राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून भरला उमेदवारी अर्ज

पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची बंडखोरी, तर कसब्यातून रवींद्र धंगेकर यांनी घेतली माघार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केले. हडपसर मतदारसंघातून शहराध्यक्ष चेतन तुपे, खडकवासलातून नगरसेवक सचिन दोडके, पर्वतीतून नगरसेविका अश्विनी कदम तर, वडगावशेरी मतदारसंघातून नगरसेवक सुनील टिंगरे यांनी अर्ज दाखल केला.

पर्वती मतदारसंघात काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला. तर, कसबा मतदारसंघातून नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस उमेदवार अरविंद शिंदे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे यांनी अर्ज दाखल केला.

वडगावशेरी मतदारसंघात बंडखोरी करून शिवसेनेचे माजी गटनेते तसेच नगरसेवक संजय भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे. तर, 8 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची यादी अंतिम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.