Pune : नवले पूल परिसरात आणखी एक अपघात, महामार्गावर पिकप गाडी पलटली

एमपीसी न्यूज : बंगळुरू महामार्गावरील नवले पुल (Pune) परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाले. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला.

याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेन च्या साहाय्याने बाजूला केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीकअप वाहनचालकाच्या म्हणण्यानुसार माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले. गेल्या आठवड्यात सात दिवसांत आठ अपघात या परिसरात झाले आहेत.

Alandi : आळंदीमध्ये के. के. निकम यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.