Pune News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासांठी (Pune News) क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी खेळाडूंनी 16 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार तसेच शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

Pimpri News : सिंधी बांधवांकडून लाल लोही उत्साहात साजरा

इच्छुकांनी सन 2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज करावेज. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (Pune News) उपलब्ध असून डाउनलोड करुन घ्यावेत, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक अनिल चोरमले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.