Pimpri News : सिंधी बांधवांकडून लाल लोही उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : सालाबादप्रमाणे यंदाही सिंधी बांधवांनी “लाल लोही ” हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला गेला. दोन वर्षे कोरोना मुळे हा उत्सव झाला नव्हता (Pimpri News) त्या मुळे या वर्षी सिंधी बांधवांनी मोठ्या प्रमाणात या उत्सवासाठी गर्दी केली होती. या वेळी सिंधी समाजातील प्रतिष्ठीत राजुशेठ आसवानी आणि श्रीसेठ आसवानी यांनी सपत्नीक ” लाल लोही ” चे पुजन करून अग्नि प्रज्वलित करून सुरवात केली.

या वेळी परंपरेप्रमाणे संत झुलेलाल यांची आरती करण्यात आली. तसेच सिंधी भाषेतील भजने म्हणुन कार्यक्रमाचा आनंद आणखीन द्वीगुणीत झाला . विषेश म्हणजे या वर्षी महिला आणि लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

Pune News : जी- 20 च्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवकांशी संवाद

हा कार्यक्रम अखंड सिंधी समाज पिंपरी-चिंचवड, पुणे आणि राजु आसवानी असोसिएट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी राजु आसवानी, अनिल आसवानी, आसवानी, श्रीचंद नागरानी, अॅड सुशिल बजाज, अजित कंजवानी, हिरो रिजवानी, मनोज पंजाबी,कैलाश बजाज, (Pimpri News) नारायण नाथानी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकीता रामनानी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपमहापौर ढब्बू आसवानी यांचे विषेश सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.