Pune : आदर्श समाजसेवक 2019 पुरस्काराने आरिफभाई शेख सन्मानित

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय शिक्षा दिवस आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स असोशिएशनतर्फे दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार यंदा छावा स्वराज्य सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख यांना प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

मौलाना अबुल कलाम आझाद ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अमानत शेख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच छावा स्वराज्य सेना (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक (पाटील) यांना उत्कृष्ट जन संघटन आणि समाजकार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. एस. एन. पठाण, प्रा. सुभाष वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उंबरे, ट्रस्टचे सचिव रफिक तांबोळी आणि इतर पदाधिकारी तसेच छावा स्वराज्य सेना, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश जाधव, पुणे जिल्हा कार्यध्यक्ष सरफराज शेख, येरवडा गाव अध्यक्ष शुभम चव्हाण आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.