Pune : दहा हजाराचाही लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास पकडले

एमपीसी न्यूज- पोल शिफ्टींग व मीटर बसवलेच्या कामाचा मोबदला म्हणून 10 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 12) रंगेहाथ पकडले.

सचिन रघुनाथ पवार (वय 37, रा. प्लॉट नं 2 श्री अपार्टमेन्ट मांजरी) असे लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणच्या ठेकेदाराने तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोल शिफ्टींग व मीटर बसवलेच्या कामाचा मोबदला म्हणून आरोपी पवार याने तक्रारदाराकडे 10 हजराची लाच मागितली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची खातरजमा करून नसरापूर येथील महावितरणच्या कार्यालयात वरील कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.