BNR-HDR-TOP-Mobile

Pune : एसएनबीपी अॅकॅडमीसह पुणे, औरंगाबाद उपांत्य फेरीत

राज्य स्तरीय महिला हॉकी स्पर्धा

एमपीसी न्यूज –  यजमान एसएनबीपी अॅकॅडमीसह पुणे आणि औरंगाबाद संघांनी सहज विजय मिळवून येथे सुरू असलेल्या महिलांच्या दुसऱ्या राज्य स्तरीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर सुरू आहे.

एसएनबीपी अॅकॅडमी संघाने कर्णधार इस्थर पांडे हिने नोंदविलेल्या तीन गोलच्या जोरावर जालना संघाचा 5-0 असा पराभव केला. तिला यज्ञा सांगळे आणि आयेषा खान या दोघींनी एकेक गोल करत सुरेख साथ केली.

दुसऱ्या सामन्यात पुणे संघाने अर्धा डझन गोल करत जळगावचा 6-1 असा पराभव केला. पुणे संघाच्या पूजा शेंडगे हिची कामगिरी निर्णायक राहिली. तिने चार गोल केले. त्यांच्याकडून अन्य दोन गोल स्वाती जाधव आणि श्रद्धा तिवारी या दोघींनी केले. पराभूत जळगाव संघाकडून एकमात्र गोल पूजा मोहरकर हिने केला.

औरंगाबाद वसंघाने काजल आटपाटकर आणि गौरी मकाने या दोघींनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर कोल्हापूरचा 2-0 असा पराभव केला.
अन्य एका सामन्यात नाशिकला सातारा संघाकडून पुढे चाल मिळाली.

निकाल –

औरंगाबाद 2 (काजल आटपाटकर 3रे, गौरी मुकाने 26वे मिनिट) वि.वि. कोल्हापूर 0. मध्यंतर 1-0

पुणे 6 (स्वाती जाधव 7वे, पूजा शेंडगे 12, 20, 33 आणि 37वे, श्रद्धा तिवारी 28वे मिनिट) वि.वि. जळगाव 1 (पूजा मोहरकर). मध्यंतर 2-1

एसएनबीपी अॅकॅडमी 5 (इस्थर पांडे 3, 24, 34वे, यज्ञा सांगळे 8वे, आयेषा खान 40वे मिनिट) वि.वि. जालना 0. मध्यंतर 2-0

Advertisement