Pune : सुनील शेवाळे यांना पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज – पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत असलेले ( Pune ) व्यवस्थापक सुनिल दिलीप शेवाळे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे अंतर्गत औषध निर्माण शास्त्रामध्ये पी एच डी पदवी प्राप्त केली आहे.
शेवाळे यांनी डी पी यु युनीटेक सोसायटी चे डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा स्युटिकल्स सायन्सेस अँड रिसर्च, पिंपरी पुणे येथुन डॉ वैशाली उंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली,  ‘स्टडी ऑफ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट ऑफ हर्बल कंपोसाईट्स फॉल्लोविंग अकॅसिडेंटल इंजुईरीज इन एक्सपरिमेंटल अनिमल्स ‘ या विषयावर आपला शोध प्रबंधक सादर केला.

या संशोधन कार्यात डॉ. सुनिल शेवाळे यांचे डी वाय पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ सोहन चितलांगे, वृषाली भालचिम, विकास वावळे तसेच सिरम इन्स्टिट्यूटचे डॉ. हित शर्मा, डॉ समीर पारेख, डॉ प्रमोद पुजारी, डॉ शिवानी देसाई यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या या यशामध्ये त्यांची पत्नी सोनाली शेवाळे- गायकवाड, आई मालती वडील दिलीप यांनी कष्ट ( Pune ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.