Pune : भरत नाट्य मंदिराच्या 31व्या वासंतिक नाट्य महोत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज : नाट्य रसिकांसाठी पर्वणी असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या 31व्या वासंतिक नाट्य महोत्सवाला आज सुरुवात झाली.(Pune) महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत शारदा सादर करण्यात आले.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे  उपस्थित होते. (Pune) नाट्यक्षेत्रातील 128 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराने सामाजिक तसेच पारंपरिक, लोकप्रिय संगीत नाटकांचे दर्जेदार प्रयोग सादर केले आहेत. यंदाचा महोत्सव दि. 10 ते 14 मे 2023 या कालावधीत भरत नाट्य संशोधन मंदिरात सायंकाळी 6 ते 9 या वेळात आयोजित करण्यात आला आहे.

Alandi : सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना समर्पित समर्पण दिवस

संगीत नाटकांचा वारसा निष्ठेने जोपासत असल्याबद्दल भरत नाट्य संशोधन मंदिराचे कौतुक करून सुनील माळी म्हणाले, नाटक, संगीत नाटक आवडीने पाहणे हे मराठी रसिकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दि. 11 रोजी रणजित देसाई लिखित हे बंध रेशमाचे, दि. 12 रोजी गो. ब. देवल लिखित संगीत संशोय कल्लोळ, दि. 13 रोजी पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित संगीत कट्यार काळजात घुसली तर दि. 14 रोजी स्वर सम्राज्ञी या नाटकांचे प्रयोग होत आहेत. नाटककार विद्याधर गोखले यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू असल्याने विशेषत्वेकरून त्यांच्या स्वर सम्राज्ञी या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

 

चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे, रवींद्र खरे, संजय डोळे, कविता मेहेंदळे, गौरी पाटील, भाग्यश्री देसाई, अनुष्का आपटे, भक्ती पागे, चारूलता पाटणकर यांच्यासह (Pune) अनेक अनुभवी तसेच युवा कलाकारांचाही सहभाग आहे. सर्व नाटकांचे दिग्दर्शन रवींद्र खरे यांनी केले असून संजय गोगटे, राहुल गोळे, अभिजित जायदे, प्रसाद करंबेळकर साथसंगत करणार आहेत.

पारंपरिक, लोकप्रिय तसेच सामाजिक विषयांवरील नाट्यकृती सादर करण्याची भरत नाट्य संशोधन मंदिराची परंपरा आहे. संस्थेची दहापेक्षा अधिक नाटके तयार असून त्यातील पाच नाटके महोत्सवात सादर केली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.