Pune: लॉकडाऊनमध्ये आईला भेटायला जाण्यासाठी त्याने दुचाकी चोरली पण…

pune: bike thief arrested by pune crime branch सिद्धार्थ संतोष परदेशी (वय 29) असे चोरट्याचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती त्यामुळे अनेकांना आपल्या गावी जाता आले नाही. पण पुण्यातील एका चोरट्याने गावी जाता यावे यासाठी चक्क दुचाकी चोरल्याचा समोर आले आहे. हा चोरटा यावरच थांबला नाही तर आपली ही चोरी पचली असल्याचे समजून त्याने आणखी एक दुचाकी चोरली.

परंतु, त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडला. सिद्धार्थ संतोष परदेशी (वय 29) असे चोरट्याचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एक व्यक्ती पार्किंगमध्ये दुचाकी लावून विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

लॉकडाऊन काळात त्याला आईला भेटण्यासाठी अहमदनगर येथे जायचे होते. त्यासाठी त्याच्याकडे वाहन नव्हते. तेव्हा तो एक मोपेड दुचाकी चोरून आईला भेटण्यासाठी गेला.

तेथून परत आल्यानंतर दुचाकी चोरी करणे त्याला सोपे वाटू लागले. त्यामुळे त्याने पुन्हा दुसरी दुचाकी चोरली. त्यानंतर चोरीची दुचाकी विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.