Pune : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दीपक मानकर यांची भेट

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Pune) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आणि अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर बराच वेळ चर्चा केली. या प्रसंगी त्यांचा आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा दीपक मानकर आणि परिवार यांचे वतीने भगवान श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भीमयोद्धा फाउंडेशनचे वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

Dighi : बीआरटी बस स्टॉपला कंटेनरची धडक

यावेळी पुणे भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, जयंत येरवडेकर, शिवाजीराव मानकर, अमोल कविटकर, दत्ता सागरे, डॉ. संदीप बुटाला, हर्षवर्धन मानकर, करन मानकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ॲड. मंदारभाऊ जोशी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.