Pune : भावासारखं मानलेल्या मुख्यमंत्र्यांनी लाथ मारली तर, भाजपने माझा वापर केला – खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्र्यांना मी भावासारखं मानतो. पण त्यांनीच मला लाथ मारली असे म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. काकडे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच भाजपने माझा वापर केल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे काकडे लवकरच भाजपला रामराम करतील अशी चिन्ह आहेत.

काही दिवसांपूर्वी काकडे यांनी थेट रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करत जर शिवसेनेशी युती नाही झाली तर दानवे पराभूत होतील, अशी भविष्यवाणी वर्तवली होती. यामुळे भाजप नेते संजय काकडे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते.

  • दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तर्फे तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता काकडे यांनी इतर पक्षातून उमेदवारी मिळावी, यासाठी हालचाली वाढवल्याचे दिसत आहे. आपल्याला उमेदवारी मिळू नये, म्हणून गिरीश बापट आणि रावसाहेब दानवे कुरघोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप संजय काकडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.