Pune : 16 ते 24 डिसेंबर दरम्यान पुस्तक महोत्सव

एमपीसी न्यूज – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर (Pune )या कालावधीत होणारा पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचा निर्धार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध भाषा शिकविणाऱ्या 300 हून अधिक प्राध्यापकांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे ( Pune )संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन समिती सदस्या बागेश्री मंठाळकर, फर्ग्युसनचे प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, मराठी अभ्यास मंडळाचे प्रमुख संदीप सांगळे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Bhosari : रिव्हर सायक्लोथॉनच्या पार्श्वभूमीवर भोसरी मधील वाहतुकीत बदल

मराठे म्हणाले, पुणे शहरात पुस्तकांची जागतिक राजधानी होण्याच्या क्षमता आहेत. त्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करणे हे पहिले उद्दिष्ट असेल. अनुवाद आणि प्रकाशन अशा स्वतंत्र अभ्यासक्रमांची गरज आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे वर्षभर आयोजन करणे आवश्यक आहे.
मराठे पुढे म्हणाले, पुस्तकांच्या जागतिक राजधानीचा युनेस्कोचा दर्जा मिळाल्यास, वाचन संस्कृतीला संवर्धनासाठी शेकडो कोटींचे अनुदान मिळू शकेल आणि वेगवेगळ्या देशांतील भाषा तज्ज्ञांना पुस्तकाशी संदर्भात कार्यक्रमांसाठी पाचारण करता येईल. पुणे पुस्तक महोत्सव देशातील अन्य शहरांत झालेल्या पुस्तक महोत्सवांपेक्षा आगळावेगळा आणि मोठा ठरेल असा विश्वास वाटतो, त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

पांडे म्हणाले, अशाप्रकारचा पुस्तक महोत्सव शहरात पहिल्यांदाच होत आहे. ही पुस्तक जत्रा न होता पुस्तक वाचणाऱ्यांचा महोत्सव होईल. तो पुण्याच्या संस्कृतीला, इतिहासाला साजेसा असेल. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.