Pune : वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या

एमपीसी न्यूज :  मौजे पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित (Pune) जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वडगावशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका या दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन 31 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या दरम्यान खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील नागरिक, विविध संघटना सहभागी  होत असतात. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून जयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींच्या वाहनांकरीता पुणे- अहमदनगरनगर मार्ग हा मुख्य मार्ग असून अनुयायींची सर्व वाहने एकाचवेळी अहमदनगर रोडवरुन जयस्तंभाकडे येतात. मानवंदना दिल्यानंतर परत येणारे अनुयायी पुन्हा अहमदनगर रोडनेच जयस्तंभाकडून पुण्याकडे येत असतात. त्यामुळे नगर रोडवरील दोन्ही लेनवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

Alandi : तलवार बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही  लेन खुल्या केल्यामुळे (Pune) अनुयायांच्या वाहनांकरीता जयस्तंभाकडे जाणाऱ्या व परत येणाऱ्या वाहनांकरीता जास्त जागा उपलब्ध होऊन वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे, असेही वाहतूक  पोलीस उपायुक्त मगर यांनी कळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.