Alandi : तलवार बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – तलवार बाळगल्या प्रकरणी तरुणाला (Alandi) अटक केली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनने  शुक्रवारी (दि. 30) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केळगाव येथे करण्यात आली.

विनोद संभाजी भिसे (वय 29, रा. केळगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश्वर कोळेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भिसे याने त्याच्याकडे बेकायदेशीरपणे तलवार हे शस्त्र बाळगले (Alandi) असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केळगाव येथील रस्त्यावरून भिसे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन हजार रुपये किमतीची तलवार आढळली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.