Sangavi : दोन वेगवगळ्या कारवाईमध्ये कोयत्यासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कोयता बाळगल्याप्रकरणी सांगवी (Sangavi) पोलिसांनी आणि दरोडा विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 30) सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंगेश बापू लोखंडे (वय 25, रा. पिंपळे गुरव) याला सांगवी पोलिसांनी अटक केले आहे. पिंपळे गुरव येथील पेट्रोल पंपाच्या समोरील मोकळ्या जागेत लोखंडे कोयता घेऊन आला असता सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) रात्री दहा वाजता करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Metro: पिंपरी-चिंचवड ते पुणे दरम्यान पहिल्यांदा मेट्रो ट्रेन धावली

रोहित आश्रुबा आव्हाड (वय 23, रा. निगडी) याला दरोडा (Sangavi) विरोधी पथकाने अटक केली आहे. आव्हाड हा अजंठानगर येथील गॅस पंपाच्या मागील बाजूला कोयता घेऊन आल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.