Pune : इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली  11 वाहने आग लागून भस्मसात 

एमपीसी न्यूज- इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना आग लागून 11 वाहने भस्मसात झाली. ही घटना काल, शनिवारी मध्यरात्री दीड  वाजण्याच्या सुमारास पर्वती पायथा सानेगुरुजी शाळेसमोर घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत 6 दुचाकी व 1 रिक्षा पूर्ण जळाली असून 4 दुचाकींना आगीची झळ पोहोचली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.