Pune : परदेशातून आलेल्या आणखी 78 नागरिकांना घरातच विलग राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – परदेशातून आलेल्या आणखी 78 नागरिकांना घरातच विलग राहण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय परिसरांतर्गत परदेशातून आलेल्या 78 नागरिकांशी संपर्क साधून सर्वेक्षणातर्गत मार्गदर्शन करण्यात आले.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत परिसरातील प्रभाग क्रमांक १७,१८,१९ या भागांत घरोघरी संपर्क साधून परदेशातून आलेल्या 47 नागरिकांची भेट घेउन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय परिसरातील प्रभाग क्रमांक १९,२८,३६,३७ या परिसरातील परदेशातून आलेल्या 31 नागरिकांची भेट घेउन मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शनाअंतर्गत माहिती देताना विलगिकरण म्हणजे काय?, 14 दिवसात विलगिकरणाच्या कालावधीत काय काळजी घ्यावी?, दैनंदिन काय काळजी घ्यावी?, स्वतंत्रपणे कपडे, भांडी वापर करणे, आरोग्य तपासणी, मनपाने केलेल्या सुविधा, याबाबत माहिती दिली.

सर्वेक्षणावेळी संबंधित व्यक्तीच्या डाव्या हाताच्या पंजावर शिक्के मारण्यात आले. हे सर्वेक्षण महापालिका सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांचे नियोजनाअंतर्गत पूर्ण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.