Pune : कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम (Pune) आदींसह खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची डिसेंबर 2022 अखेरची सांख्यिकी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर 30 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहितीचा नमुना ईआर-1 प्रत्येक तिमाहीस सादर करणे आवश्यक आहे. डिसेंबर 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीचा नमुना ईआर-1 संकलनाचे काम सुरू आहे. त्याला सर्व आस्थापनांनी प्रतिसाद देत माहिती भरावी यासाठी आस्थापनांना यापूर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करून प्रत्येकाने  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे आणि आपली अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने मुदतीत सादर करावी.

Pimpri Chinchwad : महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघटनेतर्फे उद्योजकांचा सन्मान

प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी (Pune) तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा. यासंबंधी माहिती अथवा मदत आवश्यक असल्यास [email protected] किंवा  [email protected] या ईमेल पत्यावर संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.