Pune : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून सारसबागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 123 वी जयंती आहे. या (Pune) निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Pavana Dam Update : पवना धरणात 88 टक्के पाणीसाठा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात हजर झाले आहेत. या दरम्यान त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनाही अभिवादन केले आहे.

यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भिमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते. तर यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या (Pune) वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.