Pune : चौकशी आयोगाला कोणाला बोलवावे आणि कोणाला नाही चांगलेच माहीत आहे – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : वंचित बहुजन आघाडीचे (Pune) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीमा कोरेगाव आयोगासमोर चौकशीसाठी बोलावले पाहिजे अशी मागणी केल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरांना प्रतिउत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हंटले, की ”भीमा कोरेगाव आयोगाला यापूर्वी अनेकांनी पत्रे लिहिली आहेत. कमिशन आपले काम करत आहे आणि त्यांना काय करावे आणि कोणाला बोलावावे किंवा नाही हे माहित आहे. आंबेडकर हे स्वतः एक विद्वान वकील आहेत. त्यांना कायदे माहीत आहे. पण, ते सध्या जे काही करत आहेत ते प्रकरणाला एका विशिष्ट दिशेने नेण्यासाठी फक्त युक्ती आहे.”
सोमवारी प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला पत्र (Pune) लिहून ‘प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलावून घ्या’, असे म्हटले होते. आयोगाने माजी मुख्य सचिव सुमित मुळीक आणि तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही बोलावले पाहिजे, असेही त्यांनी त्यात नमूद केले.