Pune Corona News : शहरात आज नवीन 3 हजार 459 रुग्णांची नोंद, 1,104 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज सुद्धा वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 3 हजार 459 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 104  जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 32 हजार 561 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 19 हजार 452 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 459 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 14 हजार 983 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 40 लाख 07 हजार 503 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढता – उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.