Pune News : राज्य क्रीडा पुरस्कारार्थींचा सत्कार

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आणखी 6 खेळाडू आणि 11 मार्गदर्शकांचा पुणे महापालिकेच्या वतीने पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शिवछत्रपती पुरस्काराच्या धर्तीवर शहरातील गुणवंत खेळाडूंना पुणे महापालिका क्रीडा पुरस्कार देते. प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूर्वी 237 खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली होती.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आणखी 6 खेळाडू आणि 11 प्रशिक्षकांनी क्रीडा समितीकडे नव्याने अर्ज केले होते. त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण 255 खेळाडूंचा गौरव होणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीला मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.