Pune News : रामटेकडी येथील कचऱ्यावरील प्रक्रियेसाठीच्या निविदेला मंजुरी

एमपीसी न्यूज – रामटेकडी येथे साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, रामटेकडी येथे साठलेल्या एकूण 75 हजार 863 मेट्रिक टन कचऱ्यापैकी 64 लाख 235 मेट्रिक टन कचर्याच्या विल्हेवाटीचे काम बाकी आहे. गेल्या दोन महिन्यांत 11 हजार 638 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली होती. रामटेकडी येथे प्रक्रियेसाठी पुरेशी जागा नसल्याने तेथून कचऱ्याची वाहतूक करून अन्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे.

यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रति मेट्रिक टन 875 रुपये या प्रमाणे निविदेला मान्यता देण्यात आली असून, सुमारे एक लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 8 कोटी 75 लाख रुपये पर्यंतचे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.