_MPC_DIR_MPU_III

Pune Corona Outbreak: नियमांचे उल्लंघन केल्यास लॉकडाऊन – जिल्हाधिकारी

Pune Corona Outbreak: Lockdown in case of violation of rules - Collector जिल्ह्यातील कोणल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

एमपीसी न्यूज – शासनाने लॉकडाऊन शि‍थील केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसेच ग्रामीण भागात अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचे निर्दशनास येत आहे. अशी परिस्थ‍िती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिला.

_MPC_DIR_MPU_IV

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागात नागरीकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्नसमारंभात दिलेल्या नियमांचे पालन न करताच गर्दी होताना दिसून येत आहे.

त्यादृष्टीने भरारी पथके तयार करण्यात आली असून संबंधितांना कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.