Pune : वारंवार फोन करूनही कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही : महापौर

Corona patients don't get beds despite repeated phone calls: Mayor : मुख्यमंत्र्यांसमोर मांडले वास्तव

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. वारंवार फोन करूनही हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही. शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटल पुणे महापालिकेला सहकार्य करीत नाहीत, अशा तक्रारी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर केल्या.

पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक सुरू झाली आहे.

या बैठकीत महापौरांनी शहरातील कोरोना परिस्थितीचे वास्तव मांडले.

यावेळी कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ढोरे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.

कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 80 टक्के बेडस ताब्यात घेतले मात्र, तरीही समन्वयाच्या अभावी ते मिळत नाही. हॉस्पिटलच्या बिला संदर्भात अनेक तक्रारी आहेत.

त्यावर राज्य शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

कोरोना संकट काळात 300 कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाचे निदान झाल्यानंतर श्रीमंत लोक आधीच बेड बुक करतात. सर्वसामान्य नागरिकांना मात्र बेड मिळत नाही.

या बैठकीत काही आमदारांनीही कोरोना संदर्भात मुख्यामंत्र्यांकडे तक्रारी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.