Pune Corona Update : 1188 रुग्ण कोरोनामुक्त, 1764 नवे रुग्ण, 26 जणांचा मृत्यू

सध्या शहरात 885 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 530 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, गुरुवारी तब्बल 1188 रुग्ण या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 734 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1764 नवे रुग्ण आढळले. 26 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 885 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 530 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 459 रुग्ण झाले आहेत. 82 हजार 85 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 2 हजार 401 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 973 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोथरूडमधील 91 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 52 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 63 वर्षीय महिलेचा डॉ. दळवी हॉस्पिटलमध्ये, बालाजीनगरमधील 63 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 68 वर्षीय महिलेचा, वडगावशेरीतील 74 वर्षीय पुरुषाचा, फुरसुंगीतील 88 वर्षीय महिलेचा, बावधनमधील 73 वर्षीय पुरुषाचा, कोंढव्यातील 55 वर्षीय महिलेचा, आंबेगावमधील 39 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

आंबेगावमधील 90 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्डमधील 65 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिग होममध्ये, सिंहगड रोडवरील 67 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 76 वर्षीय महिलेचा, इंदिरानगरमधील 42 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, रास्ता पेठेतील 59 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

दांडेकर पुलावरील 71 वर्षीय महिलेचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 40 वर्षीय पुरुषाचा, आंबेगावमधील 61 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 67 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 36 वर्षीय पुरुषाचा औरा हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 74 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 79 वर्षीय महिलेचा AICTS हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 46 वर्षीय पुरुषाचा D. H. औंधमध्ये, पाषाणमधील 72 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 65 वर्षीय महिलेचा धनवंतरी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.