Pune Corona Update: नवे 1508 रुग्ण, 41 जणांचा मृत्यू, 730 जणांना डिस्चार्ज

Pune Corona Update: 1508 new patients, 41 deaths, 730 discharges

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रविवारी 1508 नवे रुग्ण आढळले. 730 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 41 जणांचा मृत्यू झाला.

कोरोनाचे पुणे शहरात आतापर्यंत 37 हजार 386 रुग्ण झाले आहेत. 22 हजार 611 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 976 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 13 हजार 799 आहेत. त्यापैकी 557  क्रिटिकल रुग्ण असून त्यात 94 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

शिवाजीनगरमधील 62 वर्षीय पुरुषाचा, येवलेवाडीतील 52 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 76 वर्षीय पुरुषाचा, नेताजीनगरमधील 35 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 46 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 48 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 51 वर्षीय पुरुषाचा, गुरुवार पेठेतील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

दत्तनगरमधील 64 वर्षीय पुरुषाचा, कोंढाव्यातील 75 वर्षीय महिलेचा, बोपोडीतील 75 वर्षीय पुरुषाचा, गंजपेठेतील 61 वर्षीय महिलेचा, संतनगरमधील 51 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 91 वर्षीय महिलेचा, घोरपडे पेठेतील 67 वर्षीय महिलेचा, कर्वेनगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 48 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 34 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

फुरसुंगीतील 43 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बालेवाडीतील 55 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 63 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये,  विश्रांतवाडीतील 35 वर्षीय पुरुषाचा रायसिंग मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 62 वर्षीय पुरुषाचा, ससून हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 49 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 65 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

गुरुवार पेठेतील 63 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, कात्रजमधील 68 वर्षीय पुरुषाचा, गंजपेठेतील 39 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 65 वर्षीय पुरुषाचा, शंकर शेठ रोडवरील 54 वर्षीय पुरुषाचा  दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सोमवार पेठेतील 52 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

येरवड्यातील 58 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 63 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, सासवड रोडवरील 50 वर्षीय पुरुषाचा, खराडीतील 51 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, संगमवाडीतील 50 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, वडगाव बुद्रुकमधील 45 वर्षीय पुरुषाचा मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

सेनापती बापट रोडवरील 65 वर्षीय पुरुषाचा, कर्वेनगरमधील 61 वर्षीय पुरुषाचा दिनांनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सहकारनगरमधील 83 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सत्या विहारमधील 72 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.