Pune Corona Update : पुणे शहरात नवे 377 रुग्ण, 240 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज!

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने केवळ 377 रुग्ण आढळले. तर 240 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 732 इतकी आल्यामुळे संसर्ग दर घटत आहे.

आत्तापर्यंत 1 लाख 51 हजार 735 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामधील एकूण 579 रुग्णांची स्थिती गंभीर असून 335 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 8 रुग्ण पुण्याबाहेरील होते, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, शहर आणि उपनगरातील क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमे अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकांद्वारे केली जात आहे. तरीही नागरीकांनी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या डॉक्टरकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.