Pune Corona Update : 621 नवे रुग्ण, 486 जणांना डिस्चार्ज

621 new patients, 486 discharged पुण्यात आता कोरोनाचे 27 हजार 525 रुग्ण झाले आहेत. 17 हजार 482 रुगणांनी कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – मागील 24 तासात पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी कोरोनाचे 621 नवे रुग्ण आढळले. 486 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुण्यात आता कोरोनाचे 27 हजार 525 रुग्ण झाले आहेत. 17 हजार 482 रुगणांनी कोरोनावर मात केली आहे. 840 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 9 हजार 203 ऍक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 487 जण क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 172 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाच्या आज 1 हजार 514 टेस्ट करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कर्वेनगरमधील 71 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 80 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, वडगावमधील 62 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 61 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 76 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, ससाणेनगरमधील 76 वर्षीय पुरुषाचा  रुबी हॉल क्लिनिकमध्ये मृत्यू झाला.

कात्रजमधील 62 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 50 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 53 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 38 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 65 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 69 वर्षीय महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धनकवडीतील 40 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 45 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 48 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, नवी सदाशिव पेठेतील 58 वर्षीय महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बुधवार पेठेतील 52 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, उंडरीमधील 38 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा पूना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कर्वेनगरमधील 77 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 55 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कर्वेनगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 72 वर्षीय महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सोलापूर रोडवरील 51 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, खडकीतील 73 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

इंदापूरमधील 73 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, मुळशितील 31 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, पुरंदरमधील 68 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, मांजरीमधील 59 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, उस्मानाबादमधील 51 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.