Pune Corona Update : दिवसभरात 2025 कोरोना रुग्णांची वाढ तर 4825 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात आज दिवसभरात 2025 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 4825 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज पुणे परिसरातील 54 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1401 इतके गंभीर रुग्ण आणि 6262 इतके रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4 लाख 46 हजार 564 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 33732 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 7358 रुग्णांचा मृत्यू झाला.

पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 05 हजार 474 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 13107 इतके आतापर्यंत एकूण 22 लाख 76 हजार 088 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.