Maharashtra Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

आज 60,226 जणांना डिस्चार्ज ; 48,401 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज (दि.09) देखील कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यात नव्या कोरोना रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज बरे झालेल्या 60,226 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर, 48,401 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 लाख 01 हजार 737 झाली असून, त्यापैकी 44 लाख 07 हजार 818 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 86.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 783 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक 1 लाख 316 सक्रिय रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. त्याखालोखाल नागपूर मध्ये 59 हजार 444 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 51 हजार 165, ठाण्यात 38 हजार 352 तर, नाशिक मध्ये 39 हजार 539 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज 572 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 75 हजार 849 जण मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 36 लाख 96 हजार 896 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 939 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 38 हजार 797 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.