Pune Corona Update : पुण्यात झपाट्याने रुग्णवाढ; 6225 नवे रुग्ण; 52 मृत्यूची नोंद

एमपीसी न्यूज – पुण्यात आज 6225 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 52 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 3762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला

आज पुणे परिसरातील 41 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 901 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 3876 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 90 हजार 044 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 41940 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5452 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.