Pune Crime : पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी वकील महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : चार चाकी वाहनाला साईड न दिल्याने झालेल्या (Pune Crime) वादातून पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी एका वकील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर 13 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर आता चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात एका 45 वर्षीय महिलेने फिर्यादी आहे. त्यानुसार वकील महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला आणि तिचे पती चार चाकी वाहनातून सेनापती बापट रस्त्यावरून जात होते. तर आरोपी वकील महिला ही दुचाकीवरून जात होती. साईड न दिल्याच्या कारणावरून तिने शिवीगाळ केली आणि पुढे निघून गेली. त्यानंतर फिर्यादी महिलेने काही अंतरावर जाऊन या वकील तरुणीला खाली उतरवत माझ्या पतीला शिव्या का दिल्या अशी विचारणा केली. यानंतर आरोपीने फिर्यादीसह तिच्या पतीला शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Pune : धक्कादायक! शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार; समुपदेशनातून फुटली चार वर्षांपूर्वीच्या घटनेला वाचा

यामध्ये फिर्यादीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तर फिर्यादीच्या गळ्यातील (Pune Crime) सोन्याची चैन देखील चोरण्याचा  प्रयत्न केला गेला. फिर्यादीचे पती मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार चतुर्श्रुंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.