Pune Crime : बिल्डरचे खाजगी फोटो व्हायरल न करण्यासाठी 8.3 कोटी रुपयांची मागणी

एमपीसी न्यूज : एका 67 वर्षीय व्यावसायिकाचे (Pune Crime) खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल न करण्याच्या बदल्यात 8.3 कोटी रुपयांच्या 60 बिटकॉइन्सची मागणी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पुणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात आरोपींनी ईमेल पाठवले होते.

एका प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्यावसायिकाच्या 27 वर्षीय कर्मचाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे, शिवाजीनगर पोलिसांनी काल रात्री ईमेल पाठवणाऱ्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील विद्यापीठ रोडवर बिल्डरचे कार्यालय आहे. 29 नोव्हेंबर रोजी त्याला ईमेल प्राप्त झाले आणि ते त्याच्या व्यवस्थापकाने वाचले. त्यामध्ये व्यावसायिकाला खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी मस्करी समजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, असेच ईमेल पुन्हा पुन्हा आल्याने त्यांना शंका निर्माण झाली. ईमेल पाठवणाऱ्याने क्रिप्टो चलनाच्या पाकिटात जमा केलेल्या 60 बिटकॉइन्सची मागणी केली.

नंतर आलेल्या ईमेलमध्ये पाठवणाऱ्याने पाच (Pune Crime) बिटकॉइन्स तात्काळ देण्याची मागणी केली होती आणि 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर संबंधित बिल्डरने (चेअरमन) तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.

Pune Crime : कुत्र्याला दगड मारला म्हणून शेजाऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.