Pune Crime News : पोत्यात भरून गांजाची विक्री करण्यासाठी निघालेल्या एकाला अटक, 22 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – बिबवेवाडी पोलिसांनी गांजाची विक्री करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाला सापळा रचून अटक केली. हा तरुण एका पोत्यात भरून 22 किलो गांजा विक्री साठी. हा सर्व गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

निसार मोदीन जमादार (वय 25, रा. लोणी काळभोर, मूळ. जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख राजेश उसगावकर हे कर्मचाऱ्यांसह मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना गंगाधाम परिसरातील आई माता मंदिरासमोर एक युवक दुचाकीवर गोणी घेऊन थांबला असल्याचे दिसले. पोलिसांनी या तरुणाला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला थांबवले. त्याच्या जवळ असलेल्या पोत्याची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातील पाच लाख 77 हजार रुपये किमतीचा गांजा आणि दुचाकी जप्त करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने हा गांजा कोठून आणला व तो कोणाला विक्री करणार होता, याची माहिती घेतली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.