Pune Crime News : नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 18 वर्षीय तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 18 वर्षीय तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी (दि.24) तळजाई वसाहत, पद्मावती येथे रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी अथर्व अडसूळ (वय 18, रा‌. पद्मावती, पुणे ) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दोन आठवड्यांपूर्वी आरोपींना नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी तरुणाला शिवीगाळ करत डोक्यात, पाठीवर लोखंडी हात्याऱ्याने मारहाण केली. तसेच, ‘आम्ही येथील भाई आहोत, आम्हाला कुणी नडलं तर एकेकाला संपवू’ अशी धमकी दिली व परिसरात दहशत निर्माण केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.